Update

Saturday, July 31, 2021

आयुष्यावर बोलू काही !!!

आयुष्य खूप सुंदर आहे, आणि आपल्या या आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा सुखी राहण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे।  सुखी - सुंदर - संपन्न - निरोगी आयुष्य असणं हे प्रत्येक व्यक्तीच स्वप्न असतं आणि का नसावं ? सुखी आयुष्य जगणं हा प्रत्येकाचाच अधिकार आहे।  देवा ला असं कधीच वाटत नाही कि आपल्या आयुष्यात दुःख असावं, देव संकटं देतो पण त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सुद्धा दाखवतो, आपलं काम एवढंच आहे कि आपण आपल्यासाठी योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि आपण आपलं मन आणि बुद्धी स्थिर करून आपण घेतलेल्या निर्णयाचा अवलंब केला पाहिजे।  तुझे आहे तुजपाशी परी तू जागा चुकलाशी , म्हणजेच आपल्या कडेच आपल्या प्रश्नांची उत्तर असतात, आपण च आपल्या आयुष्यात होत असलेल्या चुकीच्या गोष्टींसाठी सतत इतरांना दोष देत असतो पण आपण हे मात्र विसरतो कि आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो।  आपण आपल्या साठी घेत असलेल्या निर्णयांवर आपण आपलं भविष्य घडवत असतो, म्हणूनच जर आयुष्य उज्वल घडवायचं असेल तर योग्य निर्णय घेणं आवश्यक असतं आणि आपण घेतलेल्या निर्णयांवर आपला स्वतःचा विश्वास असायला पाहिजे।  


आयुष्यामध्ये योग्य निर्णय कसे घ्यावेत? हा प्रश्न कोणत्याही व्यक्तीला नक्कीच आयुष्यात कधी ना कधी पडत असतो।  आपला निर्णय चुकला तर काय होईल? सगळे आपल्याला हसतील का? आपली मस्करी करतील का? आपले पैसे आणि वेळ वाया जाईल का? हे आणि या सारखेच अनेक प्रश्न व्यक्तींना वेळोवेळी पडत असतात, पण एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवायची, काही नाही मिळालं तरी अनुभव तरी मिळेल या अनुभवाच्या मदतीनेच तुम्ही पुन्हा नक्कीच प्रयत्न करू शकता आणि यश मिळालं तर तुम्ही आनंद उपभोगालाच। जरी अपयश मिळालं तरी तुम्ही प्रयत्न तरी केलात आणि पुन्हा एकदा प्रयत्न करायला सुरुवात कराल तेव्हा सुरुवात अनुभवाने होईल , म्हणूनच जोखीम घ्यायला कधीच घाबरू नये , योग्य निर्णय घेण्यासाठी काही गोष्टी विचारात घेणं महत्वाचं असत। 


  • कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या गोष्टीचा चार हि बाजूनी विचार करावा।  कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्या निर्णयाचा आपल्या आयुष्यावर होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही बाजूंचा विचार करावा। संपूर्ण विचार करून एका निष्कर्षा पर्यंत यावे, विचार करताना स्वहिताचा आणि स्वतःचा उन्नतीचा विचार करावा।  निर्णय असा घ्यावा जेणे करून तुमची स्वतःची प्रगती होईल आणि तुम्ही  स्वतः आनंदी, यशस्वी आणि सुखी व्हाल।  एकदा विचार केल्यावर आणि विचार करून निर्णय घेतल्यावर त्या निर्णयावर ठाम राहावे आणि स्वतः स्वतःसाठी घेतलेल्या निर्णयाचा अवलंब करावा।  

  • आपल्या आयुष्यामध्ये अशा अनेक व्यक्ती असतात ज्या आपलं आयुष्य प्रभावित करत असतात।  प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या अनुभवानुसार तुम्हाला काही ना काही सांगत असते , पण आपल्या आयुष्यात आपल्याला काय बनायचं आहे किंवा आपल्या आयुष्यात आपल्याला काय करायचं आहे हा निर्णय तुम्ही स्वतः घ्यायचा आहे।  जर तुम्ही सद्सद विवेक बुद्धी ठेवून स्वतःचा अंतरात्मा जे बोलतो ते ऐकता तर तुम्ही आयुष्यामध्ये कधीच अयशस्वी होऊ शकत नाही।  म्हणूनच कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुम्ही एकदा स्वतःसाठी स्वतःशीच चर्चा जरूर करा, स्वतः स्वतःवर नक्कीच विचार करा आणि जेव्हा तुम्हाला तो निर्णय योग्य वाटेल तेव्हाच त्या योग्य निर्णयाचा अवलंब करा । 

  • आपल्याला जे करायचं आहे किंवा जे बनायचं आहे ते आधीच केलेली माणसं आहेत।  तुम्हाला ज्या क्षेत्रात जायचं आहे , जे बनायचं आहे त्या क्षेत्रात आधीच यशस्वी झालेल्या लोकांच्या संपर्कात या , त्यांचे अनुभव ऐका , त्यांचा सोबत तुमचे अनुभव व्यक्त करा।  तुमच्या समस्या किंवा तुमचे प्रश्न तुम्ही त्यांना विचारून तुम्ही त्यांचा सल्ला घेऊ शकता आणि हाच सल्ला घेऊन तुम्ही स्वतःसाठी योग्य ती दिशा ठरवू शकता, पण कोणाचेही आंधळेपणाने अनुसरण करू नये त्या व्यक्तीचा सल्ला नक्की घ्यावा पण त्या सल्ल्यावर स्वतः विचार करून स्वतःला स्वतःसाठी जे योग्य वाटत त्या गोष्टी चा विचार करूनच योग्य तो निर्णय घ्यावा।  

  • रागामध्ये किंवा अत्यंत आनंदी असताना आयुष्यात कोणताही निर्णय घेऊ नये।  तुम्ही निर्णय घेताना अत्यंत गडबड घाई कधीच करू नये। अनेकदा काही व्यक्ती तुम्हाला फार त्रास देत असतात , तुमच्या भावनांना उचंबळून आणतात आणि यामुळे तुम्ही अत्यंत क्रोधीत होता आणि आवेशामध्ये येऊन चुकीचा निर्णय घेता, तुम्हाला स्वतःचे मन शांत ठेवून स्वतःच्या सद्सद विवेक बुद्धीचा वापर करूनच निर्णय घेतले पाहिजेत। रागात किंवा अत्यंत आनंदी असताना भावनेच्या भारत घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा पच्छाताप करण्याची वेळ येते म्हणूनच स्वतःला शांत ठेवा, माहिती घ्या, अर्धवट ज्ञानाने घेतलेली माहिती तुम्हाला पच्छाताप करायला लावते।  आवेशामध्ये घेतलेल्या चुकीचा निर्णयामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं आणि त्या चुकलेल्या मार्गावरून पुन्हा येण्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ वाया जाऊ शकतो आणि तुमचं आयुष्य असच वाया जाईल।   

  • आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेतल्यावर त्यावर अवलंब करताना अनेक अडचणी संकटांचा तुम्हाला सामना करावा लागेल। लोक सुद्धा तुमची मस्करी उडवू शकतात , तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न करतील पण यामुळे तुम्ही तुमचं मनोबल मुळीच खच्ची करून घेऊ नका । याउलट तुम्ही या परिस्थिती ला एका प्रकारे आव्हान च्या स्वरूपात स्वीकारा। आव्हाने स्वीकारा । स्वतःला सतत सांगत राहा कि मला स्वतःला सिद्ध करायचं आहे। तुम्ही एकदा यशस्वी झालात कि हीच माणसं जी तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करत होती हीच माणसं तुमची ओळख गर्वाने सांगतील आणि तुमचे उदाहरण देऊन तुमच्या पावलांवर चालण्याचे सल्ले इतरांना देतील।  येणाऱ्या अडचणींना एका संधीच्या रूपात पहा आणि आव्हानांचा स्वीकार करून यशस्वी व्हा।  

No comments:

Post a Comment